जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या,उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार व नामदार एच.के.पाटील यांची भेट घेतली.महापुराची परिस्थिती उदभवू नये अशा पद्धतीने अलमट्टी धरणातून होणाऱ्या पाणी विसर्गाचे आवश्यक ते नियोजन करण्याची सूचना संबंधित अधिकारी व विभागांना करावी,अशी विनंती केली.याला सकारात्मक प्रतिसाद देत नामदार डी.के. शिवकुमार यांनी अलमट्टी धरणातील पाणी विसर्गाबाबत त्वरित योग्य उपाययोजना करण्याबाबत सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्याला महापुराच्या संकटाला सामोरे जावे लागू नये,यासाठी आम्ही परस्पर सहकार्याने काम करत आहोत,असे आ.सतेज पाटील यांनी सांगितले.