जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित, "महाआरोग्य शिबिरा"च्या माध्यमातून अविरतपणे कार्य सुरू असून,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा.संजय बजाज युवक शहर जिल्हाध्यक्ष मा.राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली,आज सुदर्शन आय हॉस्पिटल सांगली येथे मोतीबिंदू ऑपरेशनची 111 वी बॅच पार पडली.सदर बॅचमध्ये आज 18 रुग्णांचे मोफत ऑपरेशन करण्यात आले.
गेले अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहरजिल्हाध्यक्ष संजय बजाज तसेच युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली,गरजू आणि गरीब रुग्णांना रुग्णसेवा देण्यात येत आहे.या "महाआरोग्य शिबिरा"च्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील हजारो रुग्णांना आरोग्यसेवेचा लाभ मिळत आहे.तरी या आरोग्य शिबिराचा ज्या गरजू रुग्णांना लाभ घ्यायचा असेल त्यांनी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या आपल्या भागातील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन शहरजिल्हाध्यक्ष मा.संजय बजाज स यांच्याकडून करण्यात आले आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शहरजिल्हा उपाध्यक्ष व नगरसेवक हरिदास पाटील,युवा नेते अभिजित कोळी,सांगलीवाडी चे पक्षाचे जेष्ठ नेते आकाराम कदम,युवती शहरजिल्हाध्यक्षा अमृता चोपडे,सहकार सेलचे शहरजिल्हाध्यक्ष तथा युवक शहरजिल्हा उपाध्यक्ष मदन पाटील,कामगार सेलचे सांगली शहर उपाध्यक्ष अमित चव्हाण उपस्थित होते,तसेच आरोग्यदूत उमर गवंडी,प्रमुख सचिव व विद्यार्थी शहरजिल्हाध्यक्ष डॉ.शुभम जाधव, सेवादल व ग्राहक संरक्षण समितीचे शहरजिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे,रोहित आठवले आदी पदाधिकारी उपस्थित होते.सदर कामाचा पाठपुरावा आरोग्यदूत उमर गवंडी,मा.रोहित आठवले,प्रमुख सचिव व विद्यार्थी शहरजिल्हाध्यक्ष डॉ.शुभम जाधव व पक्षाचे खजिनदार मा.निलेश शहा यांनी केला.