जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
आयपीएल तसेच एमपीएल च्या धर्तीवर सांगलीमध्ये सांगली जिल्ह्यातील खेळाडूंसाठी एसडीएल म्हणजे सांगली डिस्ट्रिक्ट लीग सिझन १ या भव्य स्पर्धेचे आयोजन येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर येत्या 21 सप्टेंबर पासून 13 ऑक्टोबर पर्यंत करण्यात आले आहे.या स्पर्धेत सहा संघ आहेत.अभिजित कोळी यांचा एसएमकेसी सोलजर्स, पलुस- कडेगांव पँथर्स, मनोज यादव यांचा इस्लामपूर - शिराळा ब्लास्टरस, विजय वावरे, प्रशांत पाटील व सतीश सुर्वे यांचा तासगाव- कवठेमहांकाळ टायटन्स, फारुक उमरणी व ओंकारेश्वर सावंत यांचा जथ जायेंट्स व सूरज पवार पी५२ ग्रूप यांचा विटा आटपाडी वॉरियर्स अशी या संघ मालकांचे व संघांची नावे आहेत. 200 पेक्षा अधिक खेळाडू लिलाव प्रक्रियेत सहभागी झाले होते त्यातून 110 खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसतील.या स्पर्धेतील विजेता संघास २.५ लाख रुपये रोख व चषक तसेच उपविजेत्या संघास २ लाख रुपये रोख व चषक देण्यात येणार आहे.संपूर्ण स्पर्धा ही यु ट्यूब माध्यमावर लाईव्ह प्रदर्शित होणार आहे.
पोलाईट स्पोर्ट्स क्लब चे अध्यक्ष,सांगली जिल्हा क्रिकेट संघटनेचे कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे खजिनदार मा.संजय जी बजाज साहेबांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण स्पर्धा पार पाडत आहे.गेल्या काही वर्षांपासून मा. बजाज साहेबांचे सांगली तसेच महाराष्ट्र क्रिकेट मध्ये मोलाचे योगदान आहे.येथील मुले व मुली यांना महाराष्ट्र संघात आता स्थान मिळत आहे.रणजी ट्रॉफी पासून महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये आज सांगलीचे खेळाडू चमकताना दिसतात.तसेच अनेक कोचेस,निवड समिती सदस्य व फिजीओ यांना देखील महाराष्ट्र संघात संधी मिळत आहे. जिल्ह्यातील क्रिकेट आणखी वाढावे यासाठी एसडीएल स्पर्धा ही महत्त्वाची ठरणार आहे.पोलाईट स्पोर्ट्स क्लब यांनी १९९४ पासून अनेक स्पर्धा गाजवल्या आणि नियोजन केल्या आहेत.आजही पोलाइट चे सर्व सदस्य दिवस रात्र मेहनत करून स्पर्धा यशस्वीपणे पार पाडावी याची काळजी घेत आहेत.यामधे युसुफ जमादार,राहुल आरवडे,प्रितेश कोठारी,अमित फारणे,गणेश कुकडे,धनंजय डूबल,विजय शिंदे,विजय वावरे,सागर कोरे, कपिल गस्ते,विजय कदम,कल्लाप्पा शिंदे,सुमित चव्हाण व चेतन पडीयार यांचे योगदान आहे.