जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यात दि.23 सप्टेंबर ते दि.27 सप्टेंबर2024 अखेर परतीच्या पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.महाराष्ट्र राज्यातील सर्वच भागात 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2024 पर्यंत पाच दिवसात चांगला पाऊस होण्याचे संकेत भारतीय हवामान खात्याने दिले आहेत.दरम्यान बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचा पट्टा या पाच दिवसाच्या दरम्यान सक्रिय होत असल्याचे दिसत आहे.त्यामुळे महाराष्ट्र राज्यात व देशात सर्वत्र चांगला पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील मध्य महाराष्ट्रात व त्याचबरोबर कोकणात देखील मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.देशातील पश्चिम राजस्थानच्या सीमेपासून 23 सप्टेंबर 2024 पासून परतीचा पाऊस सुरू होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकंदरीतच यंदाच्या वर्षी देशातील सर्वच भागातील सर्वच क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने बळीराजा मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.देशातील व राज्यातील बहुतांश धरणामध्ये पाण्याचा साठा देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला असून त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.