जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तहसीलदार कार्यालय येथे दि.30 सप्टेंबर 2024 रोजी,"आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन"तहसीलदार सुशील बेलेकर यांच्या प्रमुख उपस्थित साजरा करण्यात आला.
आज झालेल्या हातकणंगले तहसीलदार कार्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाबाबतचे महत्त्व व माहिती अधिकार संबंधी महत्त्वाची माहिती विशद करण्यात आली.
ह्या सर्व कार्यक्रमाचे नियोजन दुय्यम निबंधक श्रेणी वर्ग-१ दिलीप कुमार काळे यांच्याकडून करण्यात आले होते.हातकणंगले तालुका सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत मध्ये तसेच माहिती अधिकारचे जिल्हा अध्यक्ष मा.जयराज कोळी व हातकणंगले तालुका अध्यक्ष मा.देवदास कांबळे,विनायक यादव,शरद पोवार,अमृत पाटील गौतम दिवाण भरतेंद्र पाटील व सर्व पदाधिकारी यांना सोबत घेऊन दुय्यम निबंधक श्रेणी 1 मा.दिलीप कुमार काळे यांच्यामार्फत हा कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला..
या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते अभिजित पटवा यांनी मार्गदर्शन केले.एकंदरीतच आजचा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तहसीलदार कार्यालयातील"आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन",मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.