जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी हे दि.4 ऑक्टोबर व दि.5 ऑक्टोबर 2024 रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून,दि.4 ऑक्टोंबर शुक्रवार रोजी सायंकाळी 6:00 वाजता,कसबा बावड्यातील भगवा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होईल.कोल्हापूर शहरातील 81 प्रभागांमध्ये याचवेळी भव्य आतिषबाजी केली जाणार असून, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधीजी यांचा दौरा यशस्वी होण्यासाठी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घ्यावा तसेच नीटनेटके नियोजन करावे असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर,कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या झालेल्या नियोजन बैठकीत ते बोलत होते.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचे दि.4 ऑक्टोंबर 2024 शुक्रवारी दुपारी 4:00 वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन होणार असून, त्यांच्या कार्यक्रमाच्या दरम्यान असलेल्या रोडवर रोडशो व स्वागत करण्यात येणार आहे.
दरम्यान दि.5 सप्टेंबर 2024 रोजी कोल्हापुरातील पॅव्हेलियन मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित महानाट्याचा कार्यक्रम होणार असून, जवळपास 2000 कलाकारांचा यात सहभाग असणार आहे, शिवाय 1000 कलाकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत असतील.एकंदरीतच लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा यशस्वी होण्यासाठी,कोल्हापुरातील जिल्हा काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कार्याला लागले आहेत.