जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगलीत काल शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे मागणीसाठी काल २७ सप्टेंबर रोजी सरकारचा महाळ घातला तर ४ ऑक्टोबर रोजी ना.नितीन गडकरींना काळे झेंडे दाखवणार आहेत.
शक्तिपीठ महामार्गाबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उलट सुलट विधाने करुन बाधित शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहेत.म्हणुन महाराष्ट्र सरकारचा आज स्टेशन चौकात महाळ घालुन निषेध करण्यात आला. यावेळी ५०० शेतकऱ्यांना जेवण देण्यात आले.त्याअगोदर श्री.प्रभाकर तोडकर यांनी शासनाच्या प्रतिकात्मक प्रतिमेला हार घालुन विधीवत पुजा केली.त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी घोषणा देवुन सरकारचा धि:क्कार केल्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी भात,आमटी आणि शिरा असे जेवण देण्यात आले.
महाराष्ट्र सरकार मधील मंत्री एका बाजूस महामार्ग रद्द झाला आहे.असे सांगतात तर दुसऱ्या बाजूस मा.मुख्यमंत्री फक्त नांदेड,कोल्हापूरचा विरोध आहे,असे विधान करतात,म्हणून केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णयही आज आज जाहीर करण्यात आला.
सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने करुन शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवला आहे. राज्यव्यापी आंदोलनात सांगली जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांचा सहभाग होता.असे असताना मुख्यमंत्र्यांना सांगली जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांचा विरोध दिसत नाही.म्हणून ४ ऑक्टोबर रोजी ना.गडकरींना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
यावेळी उमेश देशमुख,सतिश साखळकर,प्रभाकर तोडकर,सुनिल पवार,उमेश एडके,पैलवान विष्णू पाटिल,अभिजीत जगताप,प्रविण पाटिल,श्रीकांत पाटिल,यशवंत हरुगडे,सुधाकर पाटिल.विलास थोरात,राजेश पाटिल,विलास पाटिल,धनाजी पाटिल तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.