जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज जवळपास 2 तास चाललेल्या बैठकीत एकूण 49 महत्त्वाचे निर्णय घेतले असून,राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कुणबी संदर्भातील संदीप शिंदे समितीचा अहवाल स्वीकारून,राज्यातील देशी गाईला "राज्य माता गोमाता" हा दर्जा बहाल करण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्यातील कोतवाल,ग्रामरोजगार सेवक व होमगार्ड यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आली असून,सिद्धिविनायक गणपती मंदिर समिती आता पंधरा सदस्यीय समिती राहणार आहे.महाराष्ट्र राज्यातील आयुर्वेद महाविद्यालयातील पदभरतीसाठी निवड समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात असून,जामखेड मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूतगिरणीला अर्थसाह्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्यातील सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापना येणार आहे.त्याचबरोबर कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढविण्यात आले असून,धारावीतील अपात्र झोपडपट्टी धारकांना देखील परवडणारी भाडेतत्त्वावर घरे देण्यात येणार आहेत.
दरम्यान आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील देशी गाईला "राज्यमाता गोमाता"असा दर्जा देण्यात आला असून,यासह आजच्या झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठकीत एकूण 49 निर्णयावर मान्यतेची मोहोर उमटली आहे.एकंदरीतच महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.