कोल्हापुरातील उपसंचालक कार्यालयाच्या समोर सुरू असलेल्या शिक्षकांच्या आंदोलनास,56 व्या दिवशी उग्र स्वरूप धारण आत्मदहन करताना शेकडो शिक्षकांना घेतले ताब्यात.--!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

कोल्हापुरातील शिक्षकांच्या आंदोलनाने आज उग्र स्वरूप धारण केले.आत्मदहन करताना शेकडो शिक्षकांना घेतले ताब्यात घेतले आहे.2 दिवसात या बाबत निर्णय घेऊ असे आश्वासन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसनसो मुश्रीफ यांनी दिले आहे.

आंदोलनाच्या 56 व्या दिवशी आज कोल्हापूर विभागातील आंदोलन तीव्र स्वरूपाचे झाले,उपसंचालक कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते,उपस्थित हजारो शिक्षकांची आणि पोलीस यांच्यात झटापट झाली,आणि शेकडो शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतले,आपल्या रास्त न्याय मागणीसाठी गेले 2 महिने रस्त्यावर बसलेल्या शिक्षकांचा संयम सुटला आणि अखेर मरणाच्या तयारीत असताना पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले.

शासन खरंच आमच्या मरणाची वाट पाहतय का....? असा प्रश्न असंख्य शिक्षकांना पडला आहे.

अनेक कल्याणकारी घोषणा केल्या,सर्वांना निधी दिला,सगळ्या बाबतीत सक्रिय असणारे सरकार आमचा फक्त शासन निर्णय काढण्यास इतके उदासीन का...? एका दिवसात अनेक शासन निर्णय काढणारे सरकार आमच्या शिक्षकांचा एक शासननिर्णय काढण्यास इतका वेळकाढूपणा का करत आहेत...?असा प्रश्न आजही राज्यातील शिक्षकांना पडला आहे.

मा.खंडेराव जगदाळे सर आणि तब्बल 300 लोकांना दमदाटी करून आत्मदहनापूर्वीच ताब्यात घेतलं आणि जवळपास 3 तास पोलीस स्टेशनमध्ये ठेवून योग्य ती कार्यवाही करून सोडून दिले.आंदोलन झाल्यानंतर पायाला भिंगरी बांधून पुन्हा जगदाळे सर आणि शिष्टमंडळाने भैय्या माने साहेब यांची भेट घेऊन मा. हसन मुश्रीफ साहेबांना कॉल केला असता जगदाळे सर आणि मुश्रीफ साहेबांची फोनवर चर्चा झाली.सोमवारी झालेल्या बैठकीनंतर या विषयावर चर्चा झाली आहे.येणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न आहे असे मुश्रीफ साहेब म्हणाले.

काहीही झालं तरी माघार नाहीच.लवकर नाही निर्णय घेतल्यास याच्यापेक्षाही उग्र आंदोलन करणार आहोत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top