जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
आज सांगली जिल्हातील रिक्षा चालक-मालकांचा विविध अडचणी बाबत भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पै. पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा रिक्षा चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री प्रसाद गाजरे साहेब यांची भेट घेतली.राज्य सरकारने जाहीर केलेले रिक्षा कल्याणकारी मंडळ,अटोमॅटीक टेस्टींग स्टेशन ATS,ई-रिक्षा,LPG-CNG वर चालणार्या रिक्षा, रिक्षा पासिंग,१५ वर्षांची स्क्रॅपिंग पोलीसी व त्यावेळी आकारला जाणारा दंड,याबाबत सविस्तर चर्चा केली.महाराष्ट्र शासनाने रिक्षा चालक-मालक संघटनेसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करणे चा निर्णय घेऊन रिक्षा चालकांना दिलासा दिला आहे.
यामध्ये प्रामुख्याने पेन्शन व इशुरन्स चा पैशातुनच महामंडळ चालवले जावे,तसेच महामंडळाबाबत जागरुती करणे व कागदपत्रांची जुळवा जुळव करणे,online पोर्टल सुरु झाल्या नंतरच ५०० रु नोंदणी,ओळखपत्र फी व वार्षिक ३००रु सभासद फी भरणे,ई-रिक्षांनी शहरात कोठेही न फिरता त्यांना नियमानुसार एकच मार्ग निश्चीत करणे,रिक्षा स्क्रॅपींग साठी १५ वर्ष हा कालावधी न पकडतां ६,८०,००० किमि ची मर्यादा लागु करणे, शहरातील सर्व रिक्षा स्टॅाप वर सुवीधा पुरवणे, नविन अत्याधुनिक “ अटोमॅटीक टेस्टींग स्टेशन ATS “ हे सांगली पासुन १५ किमी दुर पाटगाव येथे न करता ते जुना बुधगाव रस्त्यावरील ॲाफीस शेजारी करणे शक्य असुन ते तिथेच केले जावे,जागेचा उपलब्धतेसाठी महापालिका आयुकतांची मदत घेणे अशा विविध विषयांची सविस्तर चर्चा केली.
सांगली जिल्ह्यातील रिक्षा चालकांना आपल्या रिक्षातून कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील काही भागात प्रवाशांना घेऊन जाण्याची परवानगी मिळावी या बाबत सकारात्मक चर्चा झाली,तसेच केंद्र व राज्य सरकार आणी RTA बोर्ड कडे या बाबत पाठपुरावा करण्यात येईल.
यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष महादेव पवार,उपाध्यक्ष सुरेश गलांडे,सेक्रेटरी अरुण धनवडे,सुलेमान शेख,शौकत शेख,बाबू आटपाडे, सातपुते शेखर पवार,यादव यांच्यासह सांगली जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.