जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
कोल्हापूर शहरात गुन्ह्यात वाढ होत असताना मध्यवर्ती बसस्थानकातील एका दुकानाच्या पायरीवर गळा आवळून तरुणाचा खून केल्याचा प्रकार गुरुवारी (दि.२६) सकाळी उघडकीस आला.संदीप रामगोंडा शिरगावे (वय ३५,रा. चिंचवाड,ता.शिरोळ) अस मयताचे नाव असून या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.संशयितांच्या शोध घेण्यासाठी शाहूपुरी पोलिसांची पथके रवाना झाली होती त्यांनी दोन संशयित ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुरुवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एसटी प्रोव्हिजन स्टोअरच्या पायरीवर एक तरुण बेशुद्धा अवस्थेत पडल्याची माहिती एसटीच्या अधिका-यांकडून शाहुपुरी पोलीसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता,तो मृत झाल्याचे लक्षात आले.जवळचं त्याची बॅग होती.गळ्यावर दोरीचे व्रण दिसत असल्याने गळा आवळून त्याचा खून केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
त्याच्याकडील सापडलेल्या डायरीत असलेल्या नावावरून पोलिसांनी त्याची ओळख पटली असून.त्याचे नाव संदीप शिरगावे असल्याचे पोलिसांनी सांगितले या खुनाच्या प्रकरणी संशयित म्हणून एक महिला व एका पुरुष असे दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व शाहूपुरी पोलिसांच्या संयुक्त कारवाई करून ताब्यात घेतल्याचे समजते.