जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगलीत मराठा क्रांती मोर्चा सांगली जिल्हा यांच्यावतीने मनोज दादा जरांगे पाटील याच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.यामध्ये समाजाच्या वतीने कोणकोणती आंदोलने करावी यावर सविस्तर चर्चा झाली.त्यानुसार मनोज दादा जरांगे पाटील जे आदेश देतील ते पाळण्याचे सर्वानुमते ठरले.सांगली जिल्ह्यात 52 हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत.त्याची सर्टिफिकेट/ प्रमाणपत्रे काढणे करता युद्ध पातळीवर सामूहिक प्रयत्न करण्याचे ठरले.त्याकरिता जिल्हा पातळीवर,तालुका पातळीवर,गाव पातळीवर,वाडी वस्ती पातळीवरती,कमिटी तयार करून संघटन घट्ट करण्याचे ठरले.
वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालय,प्रांत कार्यालय तहसीलदार कार्यालय यांच्याकडून सर्व कुणबी नोंदी सुलभरीत्या मिळण्याकरता अधिकचे काम करण्याचे ठरले.
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे याची गंभीर दखल घेऊन शासनाने त्वरित तोडगा काढावा नाहीतर शासनाला मराठा समाजाच्या उद्रेकाच्या रूपाला सामोरे जावे लागेल.ते शासनाला कदापिही परवडणार नाही याची देखील शासनाने गंभीर दखल घ्यावी असा शासनाला इशारा देण्यात आला.