जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
सर्वसामान्य कष्टकरी आणि श्रमिक जनतेचा विचार करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकर्यांसाठी किसान योजना,निराधार महिलांना उज्वला गॅस योजना, मोफत उपचारासाठी आयुष्यमान भारत योजना यासह पाच वर्षे मोफत रेशनधान्य दिले.तर महायुती सरकारने महिलांना प्रत्येकी दीड हजार रूपये दिले आहेत.६८ वर्षाच्या कार्यकाळात कॉंग्रेसने साधा चमचा तरी दिला का,असा प्रश्न खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला.येणार्या विधानसभा निवडणूकीत महायुतीच्या उमेदवारांना भक्कम साथ द्यावी,असे आवाहनही खासदार महाडिक यांनी केले. शिंगणापूर फाटा येथे बांधकाम कामगारांना भांडी वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
शिंगणापूरच्या उपसरपंच सुवर्णा आवळे आणि दत्तात्रय आवळे यांच्यासह सहकार्यांच्या पुढाकाराने,करवीर तालुक्यातील अनेक गावांमधील बांधकाम कामगारांना भांडी वाटप कार्यक्रम आणि विशेष कार्यकारी अधिकारी पदाची नियुक्ती पत्रे प्रदान कार्यक्रम पार पडला.खासदार धनंजय महाडिक,बांधकाम कामगार मंडळाचे जिल्हा आयुक्त विजय घोडके,शिंगणापूरच्या उपसरपंच सुवर्णा आवळे,करवीर विधानसभा प्रमुख हंबीरराव पाटील,दत्तात्रय मेडशिंगे,राजू दिवसे,डॉ.के एन पाटील,संजय गाधी निराधार योजना समिती अध्यक्ष संजय जाधव,मारूती बुवा यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला.हंबीरराव पाटील,संजय जाधव यांनी मनोगतं व्यक्त केली.श्रमिक,कष्टकरी आणि वंचितांच्या जीवनात पंतप्रधान मोदी यांनी अच्छे दिन आणले आहेत.समाजातील सर्वच घटकांसाठी काही ना काही देण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. त्यामुळे देशातील सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले आहे. तर राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री बहिण माझी लाडकी योजनेअंतर्गत १५०० रूपये दिले आहेत.मात्र ६८ वर्षाच्या कार्यकालात कॉंग्रेसने साधा चमचा तरी दिला का, असा प्रश्न खासदार महाडिक यांनी उपस्थित केला.आयुक्त विजय घोडके यांनी, बांधकाम कामगारांसाठीच्या विविध योजनांची माहिती दिली.संजय गांधी समितीवर नियुक्त केलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाला.दत्तात्रय आवळे यांनी,या कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला.यावेळी जैद मुजावर,शिवानी पाटील,सारिका पाटील,दिगंबर हुजरे,संदीप कांबळे,संभाजी पाटील यांच्यासह विविध मान्यवर आणि महिला उपस्थित होते.