जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगली एसटी स्थानकाचे नूतनीकरण व काँक्रिटीकरण करताना उत्तर दिशेचे सगळे दरवाजे बंद केल्यास या दिशेने असलेले व्यवसाय,रिक्षा वाहतूक मोडकळीस येईल.त्यामुळे एक दरवाजा सुरू ठेवावा आणि त्या ठिकाणी एसटी थांबवून प्रवाशांच्या उतरण्याची सोय करावी,अशी मागणी करत भाजप किसान सभेचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी गुरुवारी आक्रमक भूमिका घेतली.एसटी प्रशासनाने त्यांची मागणी मान्य केली.
एसटी स्थानकाच्या नूतनीकरण व काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे.त्यासाठी सगळ्याच बस कोल्हापूर रस्त्याच्या दिशेने आणि झुलेलाल चौकाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न होता.उत्तर दिशेने सगळे दरवाजे बंद ठेवले जाणार होते.पुढील दोन ते अडीच महिन्यांसाठी हा बदल केला जाणार होता.तसे झाल्यास या दिशेला असलेले सगळे व्यापार बंद पडतील,लोकांचे जगणे मुश्कील होईल,रिक्षा चालकांना काम मिळणार नाही,अशी स्थिती होती. त्याविरोधात पृथ्वीराज पवार यांनी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली.अशा पद्धतीने नियोजन करणार असाल,तर काम होऊ देणार नाही.लोकांचे नुकसान होता कामा नये,अशी भूमिका मांडली.
एसटीचे विभाग नियंत्रण सुनील भोकरे,वाहतूक अधीक्षक विजय मोरे,आगार नियंत्रक माने मैडम यांच्याशी त्यांनी चर्चा केली.अखेर चर्चेतून मार्ग काढण्यात आला.एसटी उत्तर दिशेला असलेल्या तिसऱ्या दरवाज्यातून आत येतील आणि पार्सल केंद्राजवळ प्रवाशांच्या उतरण्याची सोय केली जाईल,असा निर्णय घेण्यात आला.त्यामुळे या बाजूनेही प्रवाशांचा वर्दळ सुरू राहणार आहे.
यावेळी चंद्रकांत सूर्यवंशी,महादेव पवार,गजूदादा बन्ने,विजय साळुंखे,दिलीप कुंभार,किशोर हेगडे,मच्छिंद्र सातपुते,उदय मुळे,अवधूत रणदिवे,तुषार मोहिते,अशोक कांबळे,विजय कोळी उपस्थित होते.