-आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू तेजस्विनी सावंत शूटिंग अकॅडमीला सदिच्छा भेट.
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
कोल्हापूर,दि.27 -: जिल्ह्यातून ऑलिम्पिक पदक विजेते स्वप्नील कुसाळे,तेजस्विनी सावंत व राही सरनोबत यांच्यासारखे विशेष प्राविण्य मिळवलेले नेमबाज तसेच कुस्ती व इतर खेळातही गुणवंत खेळाडू तयार होण्यासाठी भविष्यात सोईसुविधा दिल्या जातील,अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.त्यांनी अकॅडमीच्या उर्वरित कामांचा आढावा घेवून आवश्यक तो निधी देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी विभागीय क्रीडा संकुलाचा छत्रपती संभाजी महाराज नामांतरण सोहळा तसेच संपूर्ण शुटिंग रेंज अद्यावत करणे,रिले धावमार्ग सुधारणे,लॉन टेनीस,मल्टीपर्पज हॉल व मुलां-मुलींसाठी वसतीगृह निर्माण करण्यास पाठपुरावा करण्याच्या सूचना पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिल्या.
आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत फाउंडेशन द्वारा आयोजित नेमबाजी कार्यशाळा 2024 मध्ये प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना पालकमंत्री श्री.मुश्रीफ यांनी शुभेच्छा दिल्या.गेल्या 10 दिवसात 8 प्रशिक्षकांनी एकूण 200 प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी नि:शुल्क सहभाग नोंदविला.यावेळी,आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत,विभागीय क्रीडा व युवक सेवा उपसंचालक माणिक पाटील,तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण,अधीक्षक वसंत पाटील,नेमबाज प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आदी उपस्थित होते.