जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
राज्य शासनामार्फत आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागामार्फत जिल्ह्यातील आजरा,चंदगड,गडहिंग्लज,हातकणंगले,हुपरी,कागल,कुरुंदवाड,मलकापूर,मूरगुड,पन्हाळा,शिरोळ,वडगांव या १२ नगरपालिकांना प्रत्येकी १ फायर बाईक अशा एकूण १२ फायर बाईक (बुलेट) पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रदान करण्यात आल्या.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.,अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे,नगरपालिका प्रशासन अधिकारी नागेश मुतकेकर,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते.
या फायर बाईक (बुलेट) चा उपयोग शहरातील किंवा नागरी वस्तीत अगदी अडचणीची ठिकाणे आहेत,जिथे चिंचोळी वाट आहे,ज्या ठिकाणी अग्निशमन वाहन जाऊ शकत नाही त्या ठिकाणी एखादी आग लागली तर ती विझवण्यासाठी या साधनांचा वापर करण्यात येणार आहे.