जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,मिरज येथे शासकीय विश्रामगृहात शासकीय जिल्ह्याचा कामकाजाचा आढावा ते घेणार आहेत.महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे सकाळी जिल्ह्यातील सन्माननीय मान्यवरांशी चर्चा देखील करणार आहेत.
सांगली जिल्ह्यातील प्रश्न तसेच सांगली जिल्ह्यातील संस्कृतीक ठेवाव्यांची ओळख करून घेऊन,प्रशासनाच्या विविध विभागातील कामांच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत.महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे पहिल्यांदाच सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, सकाळी ठीक 11:30 ते दुपारी 1:00 वाजेपर्यंत त्यांचा नियोजित दौरा आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या सांगली दौऱ्यामुळे,प्राथमिक शिक्षकांचा,जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणारा आक्रोश मोर्चा स्थगित करण्यात आला असल्याची माहिती समन्वय समितीचे अध्यक्ष अविनाश गुरव व सचिव अमोल माने यांनी दिली आहे.