जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील भडकंबे येथे,सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक,श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे सचिव तथा महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे संचालक राहुल महाडिक यांचा वाढदिवस सामाजिक विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.
भडकंबे येथे सर्वसामान्य नागरिकांसाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविका,प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आशा सेविका,महावितरण,तलाठी कार्यालय,ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी व विभागातील पत्रकार बंधु यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.तसेच अंगणवाडी विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार वाटप करण्यात आला.
यावेळी रविंद्र पाटील,ग्रामपंचायत सदस्य शुभम माळी, राजारामबापू पाणीपुरवठा संस्थेचे माजी उपाध्यक्ष आनंदराव पाटील,वसंतराव माळी,दिपक बनसोडे,तानाजी जगताप,दत्तात्रय माळी,बजरंग मोरे,सुरेश पाटील,वसंत लोंढे,कृष्णात बागणे,अमोल पाटील,शिवाजी माळी, ऋषीकेश पाटील,अजय पाटील,विकास पाटील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
अंगणवाडी विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार वाटप प्रसंगी मान्यवर उपस्थित होते.
स्व.वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन सहकार,उद्योग,राजकारण,शिक्षण, सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना आधारवड असणाऱ्या राहुल महाडिक,सम्राट महाडिक व महाडिक कुटुंबियांच्या सोबत कायम राहू व महाडिक युवा शक्तीचे संघटन मजबूत करू आशा भावना यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या.