जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
वृत्त:-सोशल मीडिया.
देशाचे पंतप्रधान हे आज महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर येत असून,पुणे जिल्ह्या न्यायालय ते स्वारगेट दरम्यान धावत असणाऱ्या मेट्रो रेल्वेला संध्याकाळी हिरवा झेंडा दाखवतील. पुणे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या कामासाठी अंदाजे सुमारे 1810 कोटी रुपये खर्च आला असून, त्याबरोबरच राज्यातील विविध प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन समारंभ,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होणार आहेत.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मारकाचे,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी समारंभ संपन्न होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील जवळपास 22 हजार कोटींच्या रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.महाराष्ट्र राज्यातील सोलापूर विमानतळाच्या उद्घाटनाचा देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा होणार आहे.
एकंदरीतच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील जवळपास 22 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण सोहळा संपन्न होत होत असून, राज्याच्या विकासाला एक प्रकारे चालना मिळेल असे वाटते.