ग्रामपंचायतींना घनकचरा संकलनासाठी ई घंटागाड्यांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण.--!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अजित निंबाळकर)

घनकचरा संकलनासाठी ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या ई घंटागाड्यांचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 70 टक्के निधी उपलब्ध असलेल्या ग्रामपंचायतींनी मागणी नोंदविल्या नुसार जिल्ह्यातील 46 ई घंटा गाड्यांचा पुरवठा राज्य स्तरावरुन करण्यात येत आहे.यापैकी राज्याकडुन प्राप्त झालेल्या प्रतिनिधिक स्वरुपातील दोन ई घंटागाड्यांचे वितरण पन्हाळा तालुक्यातील ग्रामपंचायत आरळे व शाहुवाडी तालुक्यातील थेरगावचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना पालकमंत्री श्री.मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी गाव स्तरावर नॅडेफ,गांडुळ खत,कचरा वर्गीकरण शेड,तालुका स्तरावर प्लॅस्टिक प्रकीया केंद्र या प्रकल्प यंत्रणा उभारल्या आहेत.या प्रकल्पामध्ये प्रत्येक घरातून तयार होणारा घनकचरा वर्गीकरण करुन,त्याचे खतात रुपांतर होण्यासाठी,कचऱ्याची प्रकल्पापर्यंत वाहतूक करण्यासाठी राज्य शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून ई- घंटागाड्या पुरविण्यात येत आहेत. 

यावेळी या ई घंटागाड्यांची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन यांनी केली.तसेच गावातील कचरा संकलन करताना कुटुंब स्तरावरच ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी उपस्थित सरपंच व ग्रामसेवकांना दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे,मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन,जिल्हा समन्वयक तथा प्रकल्प संचालक माधुरी परीट,ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top