सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकारणीची बैठक, सांगलीतील "काँग्रेस भवनात"संपन्न.--!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकारणी बैठक, काँग्रेस भवन सांगली येथे आज आयोजित करण्यात आली होती.यावेळी स्वागत प्रास्ताविक मौलाली वंटमोरे यांनी केले. शेवटी आभार सुरेश घारगे यांनी मांडले.

यावेळी बोलताना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्री पाटील यांनी बोलताना सांगितले की-काँग्रेस सेवा दलाचे कार्य अत्यंत उत्कृष्टपणे चालू आहे.अखिल भारतीय काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाच्या अध्यक्षांनी,प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील भागांसाठी निरीक्षक नेमणूक केली असून,तळागाळापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघ निरीक्षक समन्वयक नेमले असून,काँग्रेस पक्षाच्या तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारास निवडून आणण्यासाठी,सेवा दलाने कार्य करावे असे आवाहन श्रीमती जयश्रीताई मदन भाऊ पाटील यांनी केले. 

यावेळी मिरजेचे काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार उद्योगपती  सी.आर.सांगलीकर,सेवादल जिल्हाध्यक्ष अजित ढोले, कार्याध्यक्ष विजय सिंह घारगे,धनाजी जाधव,माजी तहसीलदार विवेक अंकलीकर,आटपाडी तालुका अध्यक्ष राजेंद्र सावंत,कवठेमंकाळचे पोपट पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.कडेगाव पलूस चे निरीक्षक महादेव पाटील, जतचे अल्लाबक्ष्क्ष मुल्ला,मिरजेचे निरीक्षक पैगंबर शेख, आटपाडी खानापूरचे सुरेश घारगे,कवठेमंकाळ तासगाव सुरज शिंदे,इस्लामपूर वाळवा अशोक दादा पाटील, नागठाणे शिराळा विजयराव पाटील कासेगाव इत्यादी निरीक्षकांचा सत्कार श्रीमती जयश्रीताई पाटील व उद्योगपती सी.आर.सांगलीकर यांच्या हस्ते करण्यात आला‌.

यावेळी जिल्हा संघटक सचिव गुलाबराव भोसले,प्रकाश माने,आटपाडीचे निवृत्ती खंदारे,हनुमंत यादव,विटा शहर चे अध्यक्ष बाळासाहेब नामदेव पाटील,शिराळ्याचे अध्यक्ष तुकाराम चव्हाण,नामदेव पठाडे सौ प्रतीक्षा काळे,सीमा कुलकर्णी,मीना शिंदे,जुबेदा बिजली,विश्वास यादव,संजय पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top