जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापूर येथील करवीर निवासिनीची अंबाबाई देवीचे दर्शन आज भक्तांना बंद राहणार असून,देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील स्वच्छता केली जाणार आहे.कोल्हापूर येथील करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन आज सकाळी 9:00 वाजले पासून सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत बंद राहणार असून,या दरम्यानच्या काळात सरस्वती मंदिराशेजारी श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवीची उत्सवमूर्ती,देवी भक्तांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
सध्या कोल्हापूर येथे करवीर निवासिनी श्री.अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू असून,श्री अंबाबाई देवीच्या मंदिरालगतचा परिसर सुशोभित व स्वच्छ करणेवर , आकर्षक लाइटिंग रोषणाई करणेवर मंदिर समितीची जोरदार तयारी सुरू आहे.
आज सायंकाळी अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यातील स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर,सायंकाळी अभिषेक करून,श्री.अंबाबाई देवीची विधीवत सालंकृत पूजा करण्यात येईल असे मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.