जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
वृत्त:-सोशल मीडिया.
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आज अखेर अतिशी मार्लेना या विराजमान झालेल्या आहेत.दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर,आजच्या आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी अतिशी मार्लेना यांची निवड झाली.आज दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून अतिशी मार्लेना यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.दिल्लीचे अतिशी मार्लेना सरकार येत्या 26 किंवा 27 सप्टेंबर 2024 रोजी बहुमत सिद्ध करतील असे वाटते.
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या महिला मुख्यमंत्री म्हणून अतिशी मार्लेना या कलकाजी मतदारसंघातून निवडून आलेल्या असून,त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे.दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी मार्लेना मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून सौरभ भारद्वाज,गोपाळ राय,कैलास गेहलोत,इमरान हुसैन,मुकेश अहलावत यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी अतिशी मार्लेना यानी शपथ घेतल्यानंतर,त्यांना दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री म्हणून विराजमान होण्याचा मान मिळाला आहे.दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर अतिशी मार्लेना यांनी,आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आशीर्वाद घेतले.एकंदरीतच यापुढील दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या अतिशी मार्लेना सरकारची या पुढील कारकीर्द व वाटचाल कशी राहील.? हे बघणे योग्य ठरेल असे वाटते.