-नगरविकास विभागाद्वारे शासन निर्णय निर्गमित.
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
“महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद” या योजनेअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेस रक्कम रु.२५,१०,०००/- (अक्षरी रक्कम रु.पंचवीस कोटी दहा लक्ष) इतका निधी "कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृह व राजर्षी शाहू खासबाग मैदानाचे नुतनीकरण, जतन, संवर्धन व पुर्नबांधणी करणे.”या कामांकरिता मंजूर करुन प्रथम टप्प्यात १०% निधी वितरीत करण्यास शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात आली आहे.शासन निर्णयातील नमूद कामाची कार्यान्वयीन यंत्रणा “महानगरपालिका” असणार आहे.तसेच प्रकल्प खर्चाचा १००% हिस्सा राज्य शासनाचा असणार आहे.