होमगार्ड भरतीच्या मैदानी चाचणीसाठी पुरुष व महिला उमेदवारांनी उपस्थित रहावे.-अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई.--!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अजित निंबाळकर)

कोल्हापूर,दि.23 (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्ह्याकरिता होमगार्ड पुरुष व महिलांचा अनुशेष,रिक्त जागा भरण्याबाबत ऑनलाईन प्रणालीतुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.त्यानुसार पुरुष व महिला यांच्या प्राप्त अर्जाप्रमाणे मूळ कागदपत्र तपासणी व मैदानी चाचणी दिनांक 24 ते 26 सप्टेंबर 2024 पर्यंत आयोजित करण्यात आली होती.परंतु अतिवृष्टी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा नियोजित दौरा असल्यामुळे पोलीस मनुष्यबळाचा वापर मोठ्या प्रमाणात होणार असल्यामुळे सुधारित तारखा दिनांक 26 ते 28 सप्टेंबर 2024 पर्यंत निश्चित करण्यात आल्या आहेत.उमेदवारांनी रजिस्टर क्रमांक प्रमाणे व तारखेस नमुद वेळेस मूळ कागदपत्रे व त्याची 2-2 छायांकित प्रती कागदपत्रे व 4 कलर आयडेंटी साईज फोटोसहित उपस्थित रहावे,असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक तथा होमगार्डच्या जिल्हा समादेशक जयश्री देसाई यांनी केले आहे. 

दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 6 ते सकाळी 10, महिला- अर्ज नोंदणी क्र. 8 ते 9746 असे एकूण 1163 तर सकाळी 6.30 ते सकाळी 10.30,पुरुष- अर्ज नोंदणी क्र. 1 ते 2410 असे एकूण 2137, दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 6 ते सकाळी 10.30, पुरुष- अर्ज नोंदणी क्र. 2411 ते 6141 असे एकूण 3300 व  दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 6 ते सकाळी 10.30, पुरुष- अर्ज नोंदणी क्र. 6143 ते 9747 असे एकूण 3219 याप्रमाणे उमेदवारांनी उपस्थित रहायचे आहे.   

नियोजित तारखेस काही अपरिहार्य कारणास्तव बदल झाल्यास त्याबाबत पुढील तारीख त्या-त्या उमेदवारांना कळविण्यात येईल.उमेदवारांनी वरील नमुद वेळेत नोंदणी प्रक्रियेकरिता उपस्थित राहणे बंधनकारक आहे.नमुद वेळेनंतर उपस्थित राहणा-या उमेदवारांना नोंदणी प्रक्रियेकरिता प्रवेश दिला जाणार नाही,असेही श्रीमती देसाई यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top