जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री.तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याची अत्यंत गंभीर बाब आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी उघड केल्यावर,जगभरातील हिंदू समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.ही केवळ भेसळ नसून हिंदूंच्या धर्मश्रद्धेवर जाणीवपूर्वक केलेला धार्मिक आघात आहे.माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे वडील सॅम्युअल राजशेखर रेड्डी हे मुख्यमंत्री असतांना श्री. तिरुपती बालाजी मंदिराचे पवित्र लाडू बनवण्याचे कंत्राट एका ख्रिस्ती आस्थापनाला देण्यात आले होते,मंदिराच्या विश्वस्तपदी ख्रिस्ती व्यक्तींना नेमले गेले होते,मंदिर परिसरात ख्रिस्ती मिशनर्यांच्या धर्मांतराला प्रोत्साहन दिले गेले आदी अनेक पापे त्या काळात करण्यात आली.त्याचाच पुढचा भाग म्हणजे या प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळून हिंदूंना धर्मभ्रष्ट करण्याचे षड्यंत्र रचले गेले.ज्यांनी हे महापाप केले आहे,त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी,अशी मागणी महाराष्ट्र मंदिर संघाच्या वतीने बिनखांबी गणेश मंदिर येते 22 सप्टेंबर या दिवशी झालेल्या आंदोलनात करण्यात आली.आंदोलनात सूत्रसंचालन धर्मप्रेमी श्री.रामभाऊ मेथे यांनी केले.
या प्रसंगी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे शहर संयोजक श्री. संतोष (आप्पा) लाड म्हणाले,‘‘हिंदूंच्या मंदिरात प्रसादाच्या लाडूविषयी असा प्रकार होणे हे अत्यंत धक्कादायक आहे.मंदिर सरकारीकरणामुळे हे सर्व प्रकार होत असून त्यासाठी मंदिर सरकारीकरण रहित करणे आवश्यक आहे.’’या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री.किशोर घाटगे म्हणाले,‘‘मंदिरांचे सरकारीकरण झाल्याने महाराष्ट्रातील विविध मंदिरांमध्येही असाच प्रकारचे अपप्रकार,भ्रष्टाचार चालू आहेत.हिंदूंचे हित जपण्यासाठी हिंदूंच्या मंदिरांत कटाक्षाने हिंदूंची नेमणूक होणे आवश्यक आहे.’’ हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री.किरण दुसे म्हणाले,देशभरातील सर्वच मंदिरांमध्ये अशा प्रकारे धर्मभ्रष्टता वा हिंदु धर्मविरोधी कृती तर होत नाहीत ना,याची तपासणी करण्याची वेळ आली आहे.मंदिरांमध्ये देण्यात येणारा प्रसाद हा सात्त्विक,शुद्ध,पवित्र तर असावाच,मात्र तो बनवण्यापासून वितरण व्यवस्थेतील प्रत्येक जणही धर्मपरायण हिंदु असावा.
या प्रसंगी मंदिर महासंघाचे सहसंयोजक श्री.अभिजित पाटील,उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुकाप्रमुख श्री.राजू यादव,हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री.गजानन तोडकर,राष्ट्रहित प्रतिष्ठानचे संस्थापक श्री.शरद माळी,हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री.आनंदराव पवळ आणि श्री.किरण कुलकर्णी,विश्व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री अधिवक्ता सुधीर वंदूरकर-जोशी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी सांगवडे येथील नृसिंह मंदिराचे श्री.आप्पासाहेब गुरव,गोकुळ दूधसंघाचे संचालक श्री.एस्.आर.पाटील,ह.भ.प. महादेव यादव महाराज,हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री.मनोहर सोरप आणि श्री.जयवंत निर्मळ,अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री.शाम जोशी,हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री.दीपक देसाई,उत्तरेश्वर महादेव मंदिराचे श्री.सुभाष सुर्वेे,कुंभार समाजाचे श्री.बाळासाहेब निगवेकर,अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री.संदीप सासने आणि श्री.विकास जाधव,हिंदु जनजागृती समितीच्या कु.प्रतिभा तावरे,श्री.मधुकर नाझरे यांसह अन्य उपस्थित होते.