सांगलीतील इनामधामणी ते शंभर फुटी चौक स्वा.सै‌.भाऊसाहेब पाटील मार्गाचे पूर्ण रुंदीकरण करा अन्यथा काम बंद पाडू; सांगलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा.--सांगली शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील..--!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील जुनी धामणी - इनाम धामणी - ते शंभरफुटी चौक या स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब पाटील मार्ग या रस्त्याचे ७ मिटर रुंदीकरण करण्याचा घाट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घातला आहे.उद्या या कामाचा शुभारंभ करणार असल्याचे समजताच सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आज समक्ष मा.कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांची भेट घेऊन अपूर्ण रुंदीकरणाचा काहीही उपयोग होणार नाही.या रस्त्यावरुन स्कूल बसेस,हाॅस्पिटलकडे जाणारी वाहने, पुष्पराज चौक,वानलेसवाडी व मार्केट यार्डाकडून कोल्हापूर कडे जाणाऱ्या वाहनांची प्रचंड वर्दळ लक्षात घेता अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

या रस्त्याचे १५ मिटर रुंदीकरण करण्याचा आदेश संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना द्यावा असे म्हणताच मा.कार्यकारी अभियंत्यांनी ७ मिटर ऐवजी १० मिटर रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला जाईल असे सांगितले.पूर्ण रुंदीकरणाचे काम व्हावे व त्याची तपासणीही व्हावी अन्यथा आम्हाला नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जनहित लक्षात घेऊन अपूर्ण रुंदीकरणाचे काम नाईलाजाने थांबवणे भाग पडेल,असा खणखणीत इशारा पृथ्वीराज पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.यावेळी मारुती नवलाई,अनिल नांगरे,रविंद्र काळोखे,संतोष भोसले उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top