जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगली व मिरज येथील शेती दुष्काळ आणि अतीवृष्टीने अडचणीत आहे.अशावेळी शाश्वत रोजगार व उत्पन्नाचे साधन म्हणून उद्योग विकासाला पर्याय नाही.सांगली शहराचा भरीव विकास होण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक व मनुष्यबळांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवण्यासाठी झटणार आहे.संवाद सांगलीसाठी या उपक्रमातून शहराच्या विकासासाठी काय करता येईल याबाबत शहरातील विविध घटकांना भेटून त्यांच्या सूचना व मार्गदर्शन घेत आहे.
शहरातील बेरोजगार युवा वर्गाला रोजगार उपलब्ध होण्यासाठी मोठा उद्योग सांगलीत आला पाहिजे अशी मागणी आहे.राजकीय इच्छाशक्तीचा उल्लेख वारंवार होत असतो.यापुढे राजकीय इच्छाशक्ती हा मुद्दा निकाली काढण्यासाठी मी कटीबध्द आहे.औद्योगिक विकासाला राजकीय इच्छाशक्तीचे पाठबळ महत्त्वाचे असते.औद्योगिक क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी विधीमंडळाची ताकद वापरताना तेथे मी कमी पडणार नाही.अशी ग्वाही पृथ्वीराज पाटील यांनी दिली.संवाद सांगलीसाठी या उपक्रमांतर्गत खरे क्लब हाऊस येथे सांगली-मिरजेतील उद्योजकांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी वसंतदादा औद्योगिक वसाहत, सांगली-मिरज इंडस्ट्रीयल असो,कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ कॉमर्स,मराठा उद्योजक फौंडेशन व संजय इंडस्ट्रीयल इस्टेट मधील उद्योजकांशी पृथ्वीराज पाटील यांनी विस्तृत चर्चा केली. यावेळी औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी उद्योजकांनी अडचणी-समस्या मांडताना राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासनाचे गांभीर्य हे मुद्दे मांडले व याबाबतीत पृथ्वीराज पाटील हे सक्षम असून विधीमंडळात आमच्या समस्यांवर आवाज उठवतील असा विश्वास व्यक्त केला.स्वागत अजय देशमुख तर आभार विजय भगतसाहेब यांनी मानले.
यावेळी यशस्वी उद्योजक शहाजीराव जगदाळे,अजयराव जाधवसाहेब,चंद्रकांत पाटील,सतीश मालू,सतीश पाटील, ओमप्रकाश मालू,सचिन पाटील,शंकर रकटे, चिप्पलकट्टीसाहेब,उज्ज्वल साठेसाहेब,बिपीन कदम व पाचही औद्योगिक वसाहतीतील उद्योजक व कामगार मोठय़ा संख्येने उपस्थित होते.