जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगलीत अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष जावेद हबीब यांच्या उपस्थितीत,सांगली ज़िल्हा कार्यालयात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी बोलताना जावेद हबीब म्हणाले..भाजप सारख्या जातीयवादी पक्षास सत्तेपासून दूर ठेवणे गरजेचे आहे.आत्ताच्या भाजप सरकारने अल्पसंख्यांक समाजाच्या लोकांचे प्रगती व उन्नती साठी काहीच ठोस उपाययोजना राबवत नाहीत.लोकसभा प्रमाणे विधानसभेस देखील मुस्लिम समाजाने हिरीरीने मतदान करायला पाहिजे.मा. शरद पवार साहेब व मा.जयंत पाटील साहेब मुस्लिम समाजासाठी झटत आहेत.आपण सर्वांनी त्यांना ताकद द्यायला हवी.
यावेळी नवीन निवडी करण्यात आल्या.अल्पसंख्याक मिरज शहर अध्यक्ष वाहिद खतीब,शहर जिल्हा सचिवपदी अंजर फकीर,शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी इम्रान सुतरिया,मिरज शहर युवक उपाध्यक्ष सुहेल कोकणे,फ़हिम् मुजावर,ग्रामीण उपाध्यक्ष हाफिज इरफान मुल्लानी,शहर जिल्हा उपाध्यक्ष व इतर निवडी करण्यात आल्या.नवीन निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना प्रदेश अध्यक्ष यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराज दादा पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज,सरचिटणीस बाळासाहेब बापू पाटील,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष आयुब भैया बारगीर, युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल दादा पवार,मिरज शहर अध्यक्ष अभिजीत दादा हारगे,विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष सचिन दादा जगदाळे,युवक कार्याध्यक्ष संदीप भाऊ व्हणमांने,सामाजिक न्याय विभागाचे उत्तम आबा कांबळे, नगरसेवक हरिदास पाटील,विजय दादा माळी,अज्जू भाई पटेल,नगरसेवक मुस्ताक भाई रंगरेज,शकील भाई मुजावर, युवक अध्यक्ष शाबाज भाई कुरणे,अल्पसंख्यांक सेलचे कार्याध्यक्ष इर्शाद भाई पखाली,उपाध्यक्ष जमीर भाई ऐनापुरे,अझहर भाई सय्यद,सरफराज भाई शेख,वाजिद खतीब,अजीम मुल्ला,आश्रफ चाऊस,महालिंग हेगडे,व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.