जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(भरमा गडकरी)
बेळगावमध्ये श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानतर्फे घटस्थापना ते विजयदशमी यादरम्यान श्री.दुर्गामाता दौड काढण्यात येणार असून यंदा अन्य जिल्ह्यातही दौडचा विस्तार करण्याचा निर्णय शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या बैठकीत घेण्यात आला.दौडच्या नियोजनासंदर्भात रविवारी मारुती मंदिर,मारुती गल्ली येथे सर्व धारकऱ्यांची व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
यावेळी कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे यांनी उपस्थित धारकऱ्यांना मार्गदर्शन केले.बैठकीत प्रामुख्याने संपूर्ण कर्नाटक राज्यामध्ये यावर्षी दुर्गामाता दौड सुरू करण्यात यावी,यासाठी जिल्हानिहाय अनेक धारकऱ्यांची नियुक्ती करून प्रचारक नेमण्यात आले.तसेच बेळगाव शहर विभाग व तालुका विभागात होणारी दौड पहाटे 5.45 वाजता सुरू करावी,असे आवाहन करण्यात आले.आगामी दुर्गामाता दौड दि.3 ते दि.12 ऑक्टोबर यादरम्यान होणार आहे. ध्वज वितरण रविवारी (दि. 29) संध्याकाळी ठीक 4.30 वा. मारुती मंदिर,मारुती गल्ली येथे होणार आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील,शहर प्रमुख आनंद चौगुले, तालुकाप्रमुख परशुराम कोकितकर,तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील,प्रमोद चौगुले तसेच तालुका व शहर विभागाचे सर्व प्रमुख धारकरी उपस्थित होते.