जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी,मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी दि.16 सप्टेंबर पासून सुरू असलेले बेमुदत उपोषण अखेर स्थगित केले आहे.मराठा समाजाचे आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांचे हे जवळपास सहावे उपोषण सुरू होते व जवळपास त्यांनी नऊ दिवसानंतर उपोषण स्थगित केले आहे.नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज व अंतरवाली सराठी येथील ग्रामस्थ महिलांच्या उपस्थितीत,त्यांनी पाणी प्राशन करून आपले उपोषण स्थगित केले आहे.
निवडणूक आचारसंहिता लागेपर्यंत महाराष्ट्र शासनास वेळ असून,त्यांनी सर्व गरीब मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी मराठा समाजाचे आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
दरम्यान न्यायालयाने देखील तब्येतीची काळजी घेऊन उपचार घेण्यास सांगितले असल्यामुळे, उपस्थित जनतेचा सन्मान करत शिवाय उपोषण स्थळी येणाऱ्या समाजबांधवांचे हाल होत असून,त्यांचे त्रास बघवत नसल्यामुळे हे उपोषण स्थगित करत असल्याचे मराठा समाजाचे आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.