-आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी नोडल अधिकाऱ्यांसह विधानसभा निहाय विविध अधिकारी प्रशिक्षणास सुरुवात.
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
कोल्हापूर,दि.26 -:आगामी विधानसभा निवडणूक 2024 साठी एकूण 5 विषयांसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एकूण 10 अधिकाऱ्यांना जिल्हा व राज्यस्तरावरील विविध प्रशिक्षकांमार्फत जिल्हास्तरावर प्रशिक्षण देणे अनिवार्य आहे.या प्रशिक्षणावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी मार्गदर्शन केले.ते म्हणाले,विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्व तयारीला लागा, आचारसंहिता लागण्यापूर्वी आपण निवडणूक अनुषंगिक सर्व कामे चांगल्याप्रकारे पार पाडण्यासाठी तयारीत असावे. प्रशिक्षण प्रक्रिया प्रत्येक स्तरावर योग्यरीत्या पार पडावी यासाठी प्रयत्न करा.या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा सारथीच्या सहव्यवस्थापकीय संचालक तथा प्रशिक्षण नोडल अधिकारी किरण कुलकर्णी,उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे,निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
प्रशिक्षण घेतल्यानंतर हे अधिकारी विधानसभा मतदार संघ स्तरावरील प्रशिक्षक (ALT) म्हणून गणले जाणार असून, त्यांचेमार्फत विधानसभा मतदार संघातील उर्वरीत अधिकारी,कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी हे प्रशिक्षण दिनांक 26 व 27 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात आयोजित केले असून आज या प्रशिक्षणाची सुरुवात झाली आहे.
प्रशिक्षणामध्ये नामांकन,पात्रता,अपात्रता,छाननी,उमेदवारी मागे घेणे आणि चिन्हांचे वाटप,निवडणूक व्यवस्थापन आराखडा,असुरक्षा मॅपिंग,पोलिंग पार्टी,पोल डे,व्यवस्था, मतदान स्टेशन,खर्च निरीक्षण,आदर्श आचार संहिता, मीडिया तक्रारी,एमसीएमसी -पेड न्यूज,ई- रोल,इआरओ नेट,स्वीप,आयटी अर्ज,ईव्हीएम-व्हीव्हीपॅट,मतमोजणी आणि निकालाची घोषणा तसेच पोस्टल मतदान व इटिबीपीएस या प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.