जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सातारा येथे आज,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष माननीय विलास आवताडे यांचे सूचनेनुसार,सातारा जिल्हा काँग्रेस सेवा दलाची मीटिंग जिल्हा सेवा दल अध्यक्ष प्रताप सिंह पिसाळ देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली.या मीटिंगमध्ये सर्व तालुकाध्यक्षांनी आपल्या तालुका सेवा दलाच्या कमिट्या स्थापन कराव्यात अशी सूचना देण्यात आली.त्यानंतर सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघासाठी सेवा दलाच्या प्रभारींची नेमणूक करण्यात आली.
जिल्हा महिला सेवा दल कमिट्या पूर्ण करण्याच्या संदर्भात सुचवण्यात आले.सातारा जिल्हा काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेड अध्यक्ष निवडी संदर्भात विचार विनिमय करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्व सेवा दल कार्यकर्त्यांना, जिल्हा काँग्रेस कमिटी निरीक्षक विनय कुमार सोरके यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्यासोबत सर्व सेवा दल कार्यकर्त्यांचा फोटो काढण्यात आला.
या मीटिंगसाठी जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख,जिल्हा महिला अध्यक्षा मालन परळकर,कम्युनिकेशन कॉर्डिनेटर संदीप माने,प्रदेश प्रतिनिधी उमेश साळुंखे,संजय घाडगे,दादासाहेब घोरपडे,शाहीर प्रकाश फरांदे,आनंदराव नांगरे,वैभव गवळी, काशिनाथ पिसाळ,संजय धुमाळ,सेवा दल पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.