जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
वृत्त:-सोशल मीडिया.
श्रीलंकेच्या अध्यक्षीय पदाच्या निवडणुकीत मार्क्सवादी नेते अनुरा कुमारा दिस्सनायके यांनी विजय प्राप्त केला आहे.श्रीलंकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीत,मार्क्सवादी नेते अनुरा कुमारा दिस्सनायके यांचा विजय झाला आहे.श्रीलंकेचे माजी अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांचा त्यांनी पराभव केला आहे.श्रीलंकेमध्ये झालेल्या अध्यक्षीय पदाच्या निवडणुकीच्या कलानुसार,देशात सध्या बदलाचे वारे वाहत असल्याचे सिद्ध झाले आहे.शनिवारी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणी पहिल्या फेरीत 50 टक्क्यांपेक्षा अधिक मते न मिळाल्याने,दुसऱ्या फेरीची मतमोजणी करण्यात आली.त्यानुसार श्रीलंकेच्या अध्यक्षपदी मार्क्सवादी नेते अनुरा कुमारा दिस्सनायके यांची निवड झाली आहे.
श्रीलंकेत 2022 च्या झालेल्या जनक्रांतीत राजपक्ष कुटुंबाची सत्ता जाऊन,श्रीलंकेला आर्थिक अडचणींचा कठोर सामना करावा लागला होता.श्रीलंकेच्या सध्याच्या निवडणुकीत अध्यक्षपदी निवड झालेले अनुरा कुमारा दिस्सनायके हे एक नवा चेहरा असलेले नेते असून,भ्रष्टाचाराचा कोणताही त्यांच्यावर आरोप नाही.
एकंदरीतच श्रीलंकेच्या जनतेला हवा असलेला नवा चेहरा मिळाला असल्याचे सध्या तरी दिसत आहे.श्रीलंकेचे नूतन अध्यक्ष अनुरा कुमारा दिस्सनायके यांची पुढील कारकीर्द कशी राहते.?हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.