जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
गेले ५२ दिवसापासून कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कार्यालय या ठिकाणी सुरू असलेल आंदोलन अतिशय शांततेने व सनदशीर मार्गाने सुरू आहे,आजही त्याच अपेक्षेने की जेणेकरून इतक्या अथक परिश्रमानंतरसुद्धा कोणताही धोका न होता अनुदानाच दान महाराष्ट्रातील तमाम ७०,००० शिक्षकांच्या पदरात पडावं याच प्रामाणिक हेतूने आंदोलन करत आहेत. काल शनिवार सकाळची शाळा घेऊन मोठ्या संख्येने शिक्षक बांधव आंदोलनासाठी उपस्थित आहेत.
गेले 52 दिवसात कोल्हापूर विभाग याच मोठ्या संख्येने ताकतीने,हा रेटा लावून आहेत,तसुभरही आम्ही मागे हाटलो नाही आणि हटणार नाही.सरकारने आमचा अंत पाहू नये,लवकरात लवकर शासनाने निर्णय घेऊन हा लढा संपवावा ही नम्र विनंती महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळाकृती समितीने केली आहे.
सोमवारी हजारोच्या संख्येने शिक्षक कोल्हापूरात दाखल होणार आहेत.
अभी नही तो,कभी नही.या न्यायाने हजारो शिक्षक बांधव कोल्हापूरात दाखल होणार आहेत,या ऐतिहासिक आंदोलनाचे साक्षीदार होण्यासाठी आणि चुकूनही आपल्याला धोका होऊ नये असे वाटत असेल तर सर्वांनी घर सोडा,बाहेर पडा,कोल्हापूर गाठा आंदोलनाला चला आपली संख्याच आपल्याला अनुदान मिळवून देणार आहे.असा पक्का निर्धार सर्व शिक्षकांनी केला आहे.