जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून करण्यात आलेल्या धडाकेबाज अवैध व्यवसायाच्या विरुद्ध उघडलेल्या मोहिमेमुळे,कोल्हापूर जिल्ह्यात सध्या एकच खळबळ उडाली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली गावातील किराणा दुकानांमध्ये अंदाजे तब्बल 2 लाख 29 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्यांच्या सूचनांचे पालन करत,कोल्हापूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर,व त्यांच्या शाखेच्या कर्मचारी व अधिकारी वर्गानी मिळून अवैध विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा सुरु ठेवला.या कारवाई अंतर्गत गोपनीय बातमीदारांकडून पट्टणकोडोली गावच्या हद्दीत असलेले संशयित आरोपी संदीप दगडू शिंदे यांच्या शिंदे किराणा स्टोअर्स या दुकानात,मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत दुकानावर शुक्रवार दि.25 ऑक्टोबर रोजी छापा टाकला असता,शिंदे किराणा स्टोअर मध्ये जवळपास अंदाजे 2 लाख 29 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.सदरहू संशयित आरोपी संदीप दगडू शिंदे यांच्यावरती भारतीय गुन्हे कलमांतर्गत 123,272 274,223 प्रमाणे हुपरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद झाला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर,पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव,पोलिस अमलदार युवराज पाटील,निवृत्ती माळी,अमित सर्जे,राजेंद्र वरांडेकर यांनी केली.अधिक पोलीस तपास चालू आहे.