जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा भारतीय निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून,20 नोव्हेंबर 2024 रोजी राज्यात सर्वत्र मतदान होणार आहे. महाराष्ट्र राज्यात 23 नोव्हेंबर 2024 रोजी सर्वत्र मतमोजणी होणार असून 23 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांस अर्ज दाखल करता येणार आहेत तसेच 30 ऑक्टोबर 2024 रोजी अर्जाची छाननी करण्यात येणार असून,04 नोव्हेंबर 2024 रोजी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांस शेवटची तारीख असणार आहे.
महाराष्ट्र राज्यात एकाच टप्प्यात सर्वत्र निवडणूक होणार असून,नांदेडमध्ये पोटनिवडणुकीसाठी सुद्धा मतदान होणार आहे.महाराष्ट्र राज्यात एकूण मतदान केंद्रे ही जवळपास 01 लाख 186 असणार आहेत.महाराष्ट्र राज्यात ग्रामीण भागात 57 हजार 601 मतदान केंद्रे व शहरी भागात 42 हजार 585 मतदान केंद्रे असणार असून,यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात नवमतदारांची संख्या लक्षणीय स्वरूपात आहे.
महाराष्ट्र राज्य होणाऱ्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये असणाऱ्या बुथवर,सर्व सुविधा ठेवण्यासाठी,भारतीय निवडणूक आयोग प्रयत्नशील राहणार असल्याचे,भारतीय निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्यात 85 वर्षापेक्षा जेष्ठ असलेल्या वयस्कर नागरिकांसाठी,घरातून मतदान करण्यासाठी विशेष सोय करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाल 26 नोव्हेंबर 2024 रोज संपणार असून,त्यापूर्वी महाराष्ट्र राज्यात नवीन सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.एकंदरीतच महाराष्ट्र राज्यात यापुढे कोणत्या पक्षाचे सरकार स्थापन होणार? हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.