जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या वतीने आम्ही अनेक आंदोलने केली.परंतु अजुनही सरकारला जाग येत नाही.कारण झोपेच सोंग घेतलेल हे सरकार आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाबाबत चर्चा करण्यासाठी मा.ना. नितीन गडकरी यांची भेट पोलीस प्रशासनाने घडवुन आणावी अन्यथा त्यांना काळे झेंडे दाखवणार आहोत,असा निर्णय आज प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
७ मार्च ला अधिसुचना जाहिर झाली आणि आम्ही कृती समितीची स्थापना केली आणि महामार्ग रद्द झाला पाहीजे अशी भुमीका आपण घेतली.सर्व शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत बाधित शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात आला.२३ मार्च २०२३ रोजी सांगलीवाडी येथे १००० शेतकऱ्यांचा मेळावा पार पडला.मेळाव्यास माजी खासदार श्री.राजु शेट्टी, किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष डाॅ.उदय नारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.या मेळाव्यात आंदोलनाची दिशा ठरवली गेली.या मेळाव्याच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील बाधित १९ गावातील शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या.अधिसुचनेवर हरकती घेण्याचा पुढील कार्यक्रम होता.दि.२८ मार्च रोजी सामुदाईक पणे १००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी मिरज यांचेकडे हरकती नोंदवून बाधित शेतकऱ्यांनी आपला विरोध प्रकट केला. प्रथम मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचा कार्यक्रम ठरवण्यात आला.त्यानुसार ७ एप्रिल रोजी २०० शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.पुढे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय झाला.योगायोगाने जिल्हानियोजन मंडळाची बैठक होती.जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी बैठकीस आले होते.त्यामुळे त्यादिवशीच धरणे आंदोलन केले.या धरणे आंदोलनात ५०० हून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग होता.पालकमंत्री,दोन्ही खासदार जिल्ह्यातील सर्व आमदारांनी धरणे आंदोलनास भेट देवुन पाठींबा दिला.७ जुलै रोजी मा.खासदार शरदचंद्र पवार सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.त्यांना व्यापक शिष्टमंडळ भेटुन निवेदन दिले होते.
दरम्यान बांधकाम विभागाकडून दुसऱ्यांदा अधिसुचना जाहिर करण्यात आली.त्या अधिसुचनेवर देखिल हरकती घेण्याचा निर्णय घेण्यात आला.दरम्यान कोल्हापूर येथील सर्व पक्षीय मोर्चात सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग होता.बार्शी जि.सोलापूर येथील येथे मेळावा घेण्यात आला.सांगली जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी तुळजापूर येथील साखळी उपोषणात सहभाग नोंदवला होता.दरम्यान सात जुन रोजी बांधकाम विभागाकडून जाहिर करण्यात आलेल्या अधिसुचनेची देखिल होळी करण्यात आली.
दि.१२ ऑगस्ट रोजी शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहीजे या मागणीसाठी दुसऱ्यांदा धरणे आंदोलन करुन शेतकऱ्यांनी आपला विरोध दर्शवला होता.या कालावधीत राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याबाबत जाहीर वक्तव्य केले होते.पण काही दिवसापूर्वीच मा.मुख्यमंत्री जाहिर बोलले की विरोध फक्त नांदेड आणी कोल्हापूर येथील शेतकऱ्यांचा आहे.त्यामुळे तेथील रेखांकन बदलण्यात येईल असे विधान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे.म्हणून सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी परत आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.म्हणून दि.२७ सप्टेंबर रोजी सरकारचा महाळ घातला.महाराष्ट्र सरकार मधील काही मंत्री शक्तिपीठ महामार्गाबाबत उलट सुलट विधाने करतायत त्यामुळे महाराष्ट्र सरकार निर्णय घ्यायला असमर्थ आहे असा शेतकऱ्यांचा समज आहे.त्यामुळे देशाचे रस्ते विकास व दळणवळण मंत्री मा.ना.नितीन गडकरी हे दि.४ ऑक्टोबर रोजी सांगली जिल्ह्याच्या दौर्यावर येणार आहेत.त्यावेळी आम्हाला त्यांचेशी चर्चा करण्यासाठी प्रशासनाने वेळ ठरवुन द्यावी अन्यथा त्यांना आम्ही काळे झेंडे दाखवणार आहोत. असे शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीने स्पष्ट केले आहे.