जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगली जिल्ह्यातील पलूस येथे संग्राम लॉन्स मध्ये "विश्व संवाद फाउंडेशनच्या" वतीने पार पडलेल्या गौरी गणपती सजावट-आरास स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम काल मा.विजयमाला कदम (वहिनीसाहेब) अध्यक्षा शालेय शिक्षण समिती भारती विद्यापीठ पुणे, महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉ.विश्वजीत कदम,स्वप्नालीताई विश्वजीत कदम संचालिका भारती सहकारी ग्राहक भांडार पुणे,महेंद्र आप्पा लाड, उपाध्यक्ष रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमास सांगली जिल्ह्यातील व पोलीस येथील स्थानिक नागरिक फार मोठ्या संख्येने उपस्थित होते.पलूस येथील विश्व संवाद फाउंडेशनने गौरी गणपती सजावट आरास स्पर्धा घेतल्यामुळे,विश्व संवाद फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे.कार्यक्रमाचे निमंत्रक मा.ऋषिकेश (दादा) लाड चेअरमन भारती शुगर अँड फ्युएल्स नागेवाडी हे होते.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधान यांची प्रमुख उपस्थिती,उपस्थित सर्व स्पर्धक महिलांना सखीचे वाण,संरक्षणाचे कराटे प्रात्यक्षिक, भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम,स्टेप अप इव्हेंट अँड एंटरटेनमेंट चे सादरीकरण आणि अभिनेत्री जोया खान हिचा नृत्याअविष्कार हे होते.
या कार्यक्रमासाठी पलूस तालुक्यातील सर्व महिला पदाधिकारी स्पर्धक महिला व युवती मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या.या कार्यक्रमाचे सर्व नियोजन श्री.दीपक पाटील व सावंतपूर ग्रामपंचायतचे सदस्य श्री.मंगेश मोटे यांच्या टीमने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केले.गौरी गणपती सजावटीच्या कार्यक्रमाची पहिले बक्षीस पलूस शहरातील सौ.मनीषा पवार यांना मिळाले.