कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या शिष्टमंडळाची,शिक्षकांच्या न्याय मागण्यासाठी, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याबरोबर यशस्वी भेट;पुढील मंत्रिमंडळ बैठकीत सन्मानजनक निर्णय.--!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)


कोल्हापुरात आज तब्बल 6 तासाच्या अथक प्रतीक्षेनंतर,महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या शिष्टमंडळाची, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे बरोबर महत्वपूर्ण यशस्वी भेट झाली आहे.खासदार धैर्यशील माने व मठाचे मठाधिपती अदृश्य काडसिडेश्वर स्वामीजी यांच्या प्राधान्याने केलेल्या शिष्ठाईमुळे आजची भेट यशस्वी झाली आहे.रात्री 8.30 वाजता भेट झाली."येणाऱ्या कॅबिनेमध्ये विषय घेतोय,तुमचं काम करतोय बाबांनो" मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या पुनरुच्चारामूळे राज्यातील शिक्षकांचा उत्साह वाढला.1 ऑगस्ट पासून आज 62 दिवस कोल्हापूर विभागातील हजारो शिक्षक रस्त्यावर आहेत यांची दखल मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी घेतली,आज कृती समितीच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर येथे,मा.मुख्यमंत्री यांची भेट घेतली.त्यावेळी कणेरी मठाचे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वरआहेत महाराज यांनी व लोकप्रिय खासदार धैर्यशील माने यांनी स्वतः जगदाळे सर यांना बोलवून भेट घडवून आणली.स्वामीजींनीही आपल्या आंदोलनाची सर्व माहिती दिली आहे.

महाराज म्हणाले की आजपर्यंत चे अनुदान आपणच दिले आहे,पुढील टप्पासाठी कोल्हापूर येथे दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे त्यावेळेस मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की,याबाबत टप्पा वाढीचे काम पूर्ण झाले असून,येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय घेतला जाईल.असा विश्वास स्वामी महाराज यांच्या समोर व्यक्त केला.कृती समितीने सांगितले की गेली 62 दिवस आम्ही हजारो शिक्षक बंधू भगिनी रस्त्यावर आहोत.आम्हाला न्याय मिळाला पाहिजे.त्यावेळी मा.मुख्यमंत्री यांनी सांगितले कोल्हापूर येथील आंदोलनाबाबत मला मा.खासदार धैर्यशील माने यांनी मला माहिती दिली असून,आपणास निश्चितच न्याय दिला जाईल असे मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.आज आंदोलनाचा 62 वा दिवस आहे,जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे.

यावेळी शिवाजी कुरणे,केदारी मगदूम,सचिन आंबी,सुभाष खामकर,नितीन भुसारी शशिकांत खडके,वैजनाथ चाटे,राजू भोरे,नोबेश गावित,जनार्धन दिंडे,शिवाजी घाटगे,सचिन खोंद्रे,शिवाजी खापणे,सुधाकर चव्हाण,भाग्यश्री राणे,गौतमी पाटील,नेहा भुसारी,जयश्री पाटील इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top