जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
कोल्हापूर: दि.१ ते २ ऑक्टोंबर २०२४ रोजी महावीर कॉलेज येथे झालेल्या शालेय १९ व १७ वर्षाखालील मनपास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये श्री.शहाजी छत्रपती महाविद्यालय ज्युनियर विभाग मधील खेळाडूंची कुस्ती स्पर्धेमध्ये ४ सुवर्ण,१ रोप्यपदकाची कमाई केली.
अनुक्रमे १९ वर्षाखालील मुलांच्या मध्ये राजवीर माने (१२ वी कला) - प्रथम क्रमांक,१७ वर्षाखालील मुलींच्या मध्ये सिद्धी पाटील (११ वी वाणिज्य) - प्रथम क्रमांक तर मुलांच्या मध्ये संग्राम सातपुते(११ वी कला) - प्रथम क्रमांक,संकेत शिरगुप्पे (११ वी कला ) - प्रथम क्रमांक पटकावला.तर मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.
सर्व विजेत्या खेळाडूंना श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री.मानसिंग विजयराव बोंद्रे(दादा),प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण सर,रजिस्टर श्री.रवींद्र भोसले,अधीक्षक श्री.मनीष भोसले,आय क्यू एस सी समन्वयक डॉ.राहुल मांडणीकर सर,प्र.पर्यवेक्षक श्री.पी.के.पाटील सर,जिमखाना प्रमुख डॉ.प्रशांत पाटील,क्रीडा शिक्षक प्रा.प्रशांत मोटे,तसेच सर्व पालक या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.