जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगली जिल्ह्यातील पलूस येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा,महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी सहकार राज्यमंत्री आमदार डॉ.विश्वजीत कदम व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड यांच्या उपस्थितीत पार पडला.आज पलूस येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम खालील प्रमाणे.-
1.पलूस येथील पद्मावती मंदिर परिसर अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे आणि पेविंग ब्लॉक बसवणे.
(भूमिपूजन)
रक्कम- दहा लक्ष रुपये योजना- आमदार फंड.
2.पलूस तालूक्यातील येळावी, पलूस, नळवाडी सावंतपूर रस्ता इजिमा 89 (जुना वाळवा वाट)रस्ता सुधारणा करणे
(भूमिपूजन)
रक्कम: 25 लक्ष रुपये.
योजना: जिल्हा नियोजन समिती
3.पलूस म्हाडा कॉलनी येथील ओपन स्पेस जागेमध्ये सुशोभीकरण करणे.
(लोकार्पण)
रक्कम: 50 लक्ष रुपये.
योजना : स्वच्छ सर्वेक्षण बक्षीसपर अनुदान योजना.
या कार्यक्रमास पलूस शहरातील सर्व माजी नगरसेवक, नगरसेविका सर्व संस्थांचे प्रमुख पदाधिकारी,प्रमुख कार्यकर्ते,त्या प्रभागातील सर्व नागरिक,महिला व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.