सांगली येथे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणांची माहिती,ग्रामीण भागातील शिक्षकांना होण्यासाठी"शिक्षक प्रबोधन कार्यशाळा" संपन्न.--!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

सांगलीत आज नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणांची माहिती, ग्रामीण भागातील शिक्षकांना होण्यासाठी शिक्षक प्रबोधन कार्यशाळा घेण्यात आली असून,त्याचे आयोजन विद्या भारती शिक्षक प्रबोधन कार्यशाळने केले होते.याअंतर्गत सांगली जिल्ह्यातील एक दिवसीय शिक्षक प्रबोधन कार्यशाळा रविवारी कांतीलाल पुरुषोत्तम प्रशाले आयोजित करण्यात आली होती.सांगली जिल्ह्यातल्या ४२ शाळांमधील १४५ शिक्षक या कार्यशाळेत उपस्थित होते.इयत्ती ३ री चे १० वी पर्यंतच्या शिक्षकांचा यात सहभाग होता. 

विद्या भारतीचे महाराष्ट्र गोवा राज्याचे शिशुवाटीका संयोजक भाई उपाले यांनी कार्यशाळेत राष्ट्रीय शिक्षण धोरण व पायाभूत शिक्षण या विषयावर उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले.नविन राष्ट्रीय शिक्षण धोरण समजून घेतांना पहिल्या टप्प्यात कोणकोणत्या पायाभूत विषयांचा समावेश करायचा आहे याची सोदाहरण माहिती भाई उपाले यांनी दिली.तसेच ग्रामिण भागातल्या शिक्षकांच्या मनात असलेल्या शंकांचे समाधान प्रश्नोत्तर स्वरुपात त्यांनी केले.

तत्पुर्वी विद्या भारतीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे मंत्री रघुनाथ देवीकर यांनी विद्या भारतीचा परिचय करुन दिला.विद्या भारतीचे उपक्रम आणि संस्कृती ज्ञान परीक्षेची माहिती अनघा दणाणे यांनी करून दिली.वक्त्यांचा परिचय आणि आभार आभा तेलंग यांनी मांडले.तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनघा लिमये यांनी केले.वैशाली जोगळेकर यांनी शांतीमंत्रांने कार्यक्रमाची सांगता केली. 

सांगली विभागाचे महादेव जोगळेकर,माधव छत्रे,पुंडलिक माने,संगीता बिळगी यांनी शाळा संपर्क व्यवस्था सांभाळून अधिकाधीक शिक्षकांना कार्यशाळेत आणण्याचे प्रयत्न केले.कांतीलाल पुरुषोत्तम प्रशालेच्या प्राथमिक विभागाच्या सर्व शिक्षकांनी कार्यशाळेची व्यवस्था पाहिली.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top