जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
होंडा कंपनीचे बनावट स्पेअर पार्ट विक्री केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे.कपुराराम चेलाराम चौधरी (वय ४२,रा. सोलापूर रस्ता,कुंजीरवाडी,ता. हवेली) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.होंडा कंपनीचे अधिकारी रेवणनाथ विष्णू केकण (वय ४०,रा.काळेपडळ,हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.
कपूराराम चौधरी याचे लोणी काळभोर येथील बोरकर वस्ती येथे सत्यम अॅटोमोबाईल्स नावाचे दुकान आहे.या ठिकाणी चौधरी होंडा कंपनीच्या नावे बनावट स्पेअरपार्ट-विक्री करत असल्याचे रेवननाथ केकण यांना समजले होते.
केकण यांनी शुक्रवारी (ता.११) चौधरीच्या दुकानात पाहणी केली असता,त्यांना २१,३६० रुपये किंमतीचे होंडा कंपनीच्या अॅक्टीव्हा ३ जी मोटार सायकलचे एअर फिल्टर असलेली लाल रंगाचे १२० पॅकेट,यावर 'होंडा जेन्यूअन पार्ट्स' असे लिहिलेले व १७८ रुपये किंमत,तसेच ९ हजार ४० रुपये किंमतीचे होंडा कंपनीची अॅक्टीव्हा ६ जी दुचाकीचे एअर फिल्टरचे ६० पॅकेट,असा एकूण ३० हजार ४०० रुपये किंमतीचे बनावट स्पेअरपार्ट विक्री करत असताना आढळून आले.