जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
दि.14 ते 21 सप्टेंबर 2024 रोजी आसाम गूवाहाटी येथे RSC ओपन टॅलेंट हंट स्पर्धेमध्ये श्री.शहाजी छत्रपती महाविद्यालय मधील बी.ए.भाग-1 मध्ये शिकणारा कु.तन्मय सचिन कळंत्रे याने JSW,मिझोराम,आसाम अशा विविध राज्यातील खेळाडूंना नमवत कांस्य पदकाचा मानकरी ठरला.
तसेच संभाजीनगर येथे झालेल्या खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये बी.ए.भाग-2 मधील खेळाडूं विद्यार्थीनी कु.श्रद्धा धर्मराज कुंभार हिने विविध जिल्ह्यातील पैलवानांना पराभूत करून कांस्य पदकाची कमाई केली.
या दोघांचे ही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण सर,जिमखाना प्रमुख डॉ.प्रशांत पाटील,क्रीडा शिक्षक प्रा.प्रशांत मोटे यांचे समवेत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
सर्व विजेत्या खेळाडूंना श्री.शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री.मानसिंग विजयराव बोंद्रे(दादा),प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण सर,रजिस्टर श्री.रविंद्र भोसले,अधीक्षक श्री.मनीष भोसले,प्र.पर्यवेक्षक श्री.पी.के.पाटील सर,जिमखाना प्रमुख डॉ.प्रशांत पाटील,क्रीडा शिक्षक प्रा.प्रशांत मोटे व त्यांचे पालक या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.