जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापूर,दि.5 : कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवानिमित्त आज चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूरचा वारसा,संस्कृती व सण परंपरा या विषयांवर चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते.
विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या वेळेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.शहरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने स्पर्धेत विविध चित्र रंगवून सहभाग घेतला.