सांगलीमध्ये,सांगली जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने,राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न.--!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

राष्ट्रपिता म.गांधी यांनी अहिंसक मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे.त्यांचा राष्ट्रहिताचा विचार व वारसा खा. राहुल गांधी नेटाने पुढे नेत आहेत.ते म.गांधींचे आधुनिक रुप आहे.त्यांच्या पाठिशी राहून जातीयवादी पक्षांना व शक्तींना थारा न देण्याची प्रतिज्ञा केल्यास देशाचे भयावह चित्र बदलून देश बळकट होईल असा विश्वास डॉ.नामदेव कस्तुरे यांनी व्यक्त केला.काल सांगली काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुष्पांजली व पदयात्रा समारोप कार्यक्रमात अभिवादन करताना ते बोलत होते. 

प्रारंभी सकाळी स्टेशन चौकात म.गांधी यांच्या पुतळ्यास आमदार डॉ.विक्रमसिंह सावंत व स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी अशोक मालवणकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला प्रारंभ झाला.काँग्रेस भवन मध्ये पदयात्रेची सांगता व म.गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमा पूजनाने आणि पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. 

स्वागत पैगंबर शेख यांनी केले.प्रास्ताविक करताना अजित ढोले यांनी 'वर्षभर थोरामोठ्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून त्यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न काँग्रेस व सेवा दल करीत असते असे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात आमदार डॉ.विक्रमसिंह सावंत म्हणाले, काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. जातीयवादी प्रवृत्ती महापुरुषांच्या विचारांची पायमल्ली करत आहेत.म.गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विचारानुसार वाटचाल करणे हेच त्यांना खरे अभिवादन होय.' यावेळी गुलाबराव भोसले यांनी' 'काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे' असे आवाहन केले. आभार मौलाली वंटमुरे यांनी मानले. 

आमदार डॉ. विश्वजीत कदम व खासदार विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील व ग्रामीणचे अध्यक्ष आमदार डॉ. विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या जयंती कार्यक्रम व पदयात्रेत डॉ.नामदेव कस्तुरे,अजित ढोले, प्रकाश जगताप,बिपीन कदम,अल्ताफ पेंढारी, मालन मोहिते, अनिल मोहिते,महावीर पाटील नांद्रे,डी.पी.बनसोडे, राजेंद्र कांबळे,याकूब मणेर,सुनिल भिसे,शिवाजी सावंत, आप्पासाहेब पाटील,बाबगोंडा पाटील,अशोक मालवणकर, रंगराव शिपुगडे,भाऊसाहेब पवार वकील,गुलाबराव भोसले, अरुण पळसुले,रघुनाथ नार्वेकर,बाळासाहेब खोत,संभाजी पाटील बेडग,विवेक अंकलीकर,श्रीधर बारटक्के,विठ्ठलराव काळे,नंदकुमार साळुंखे,धैर्यशील सावंत,प्रतिक्षा काळे, कांचन खंदारे,शमशाद नायकवडी,नामदेव पठाडे,विश्वास यादव,बापूसाहेब घारगे,दिपक गायकवाड,अनिल माने, शैलेंद्र पिराळे,रघुनाथ घोरपडे,शहाजी जाधव,डॉ.अमित बसण्णावर,वसंत जाधव,गणेश वाघमारे,दिलीप माळी व काँग्रेस कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top