जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगली जिल्ह्याचे माजी खासदार हिंद रत्न प्रकाश बापू पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त,सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी येथे अभिवादन करण्यात आले.प्रारंभी कवठेमंकाळचे विलासराव बोराडे व कुंडलचे उत्तमराव पाटील यांचे हस्ते,स्वर्गीय प्रकाश बापू पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी बोलताना सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बेडचे संभाजी राजे पाटील यांनी बोलताना,प्रकाश बापू पाटील हे दूरदृष्टीची नेते होते निगर्वी आणि संयमी नेतृत्व असणारे माजी खासदार स्वर्गीय प्रकाश बापू पाटील यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये,गोरगरीब- शेतकरी- कष्टकरी लोकांच्या प्रश्नावर,संसदेमध्ये प्रश्न मांडून ते सोडवण्याचे काम केलेलेआहे.
1999 साली काँग्रेस पक्ष अडचणीत असताना सांगली मधून त्यांनी,काँग्रेस बरोबर राहण्याचा निर्णय घेतला.त्यांना डॉ. स्वर्गीय पतंगरावजी कदम व स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांनी साथ दिली.त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली,स्वतः खासदार असताना जिल्ह्यामध्ये पाच आमदार निवडून आणले होते.
यावेळी अनिल मोहिते,श्रीमंत पांढरे,माजी नगरसेवक अल्ताफ खान यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी स्वागत व प्रास्ताविक अजित ढोले जिल्हाध्यक्ष काँग्रेस सेवादल व शेवटी आभार प्रवेश संघटक पैगंबर शेख यांनी मानले.यावेळी अल्लाबक्ष मुल्ला,प्रकाश माने,अरुण पळसुले,प्रा.नंदादेवी कोलप,सौ.प्रतीक्षा काळे,विठ्ठलराव काळे,संजय शिकलगार,लालसाब तांबोळी,नामदेव पठाडे, मूफीत कोळेकर,विश्वास यादव,सुनील गुळवणी,बाबगोंडा पाटील,शैलेंद्र पिराळे,सागर सर्वदे,प्रथमेश शेटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.