जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
कोल्हापूर: कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवानिमित्त आज पारंपरिक वेशभूषा दिवस साजरा करण्यात आला.यामध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे,मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झाले.
तसेच जिल्ह्यातील विविध शासकीय,निम शासकीय अधिकारी, तहसिल कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी,शाळा,महाविद्यालय,विद्यापीठातील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी, सामाजिक क्षेत्रातील संस्था,संघटनांसह सर्व आस्थापना व सर्व नागरिक पारंपरिक वेशभूषा परिधान करुन या उपक्रमात सहभागी झाले.