केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्यातील "मराठी"भाषेला, "अभिजात भाषे"चा दर्जा देऊन,नवरात्रोत्सवाच्या सुदिनी ऐतिहासिक घट उभारणी;राज्यात सर्वत्र जल्लोष.--!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

देशातील केंद्र सरकारने,महाराष्ट्रातील मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन, नवरात्रोत्सवाच्या सुदिनी घट उभारणी केली आहे.आज केंद्र सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे,महाराष्ट्र राज्यात सर्वत्र जल्लोषाचे वातावरण पसरले असून,या निर्णयाचे विविध सन्माननीय क्षेत्रातील व्यक्तींनी आत्यानंद व्यक्त केला आहे.दरम्यान मराठी भाषा व मराठीवर प्रेम करणाऱ्या राज्यातील सर्व नागरिकांच्या साठी हा निर्णय सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्याजोगा असून,आजचा दिवस यापुढे मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जाईल असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी केले आहे. 

गेले काही दिवस महाराष्ट्र राज्यातील  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबद्दलची महाराष्ट्र सरकारने मागणी करून,केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा केला होता. त्यास आज अखेर यश मिळाले असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सांगितले आहे.नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी,माय मराठीचा बहुमान माझ्या मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

दरम्यान मराठी भाषेने आज पर्यंत देशाच्या इतिहासात समृद्ध सांस्कृतिक असे योगदान दिल्यामुळे,मराठी भाषेचा हा एक प्रकारे गौरव असून,मराठी भाषा ही देशाच्या वारस्याचा आधारस्तंभ झाली आहे,तसेच मराठी भाषेला अभिजात बाजूचा दर्जा मिळाल्यामुळे,भाषेचा देशातील स्तरांवर शिकण्याचा विकास असंख्य नागरिकांना उपलब्ध होईल असे प्रतिपादन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी केले आहे.त्याचबरोबर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल विशेष आभार विद्यमान संमेलना अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांनी मानले आहेत. संत परंपरेतील साहित्यापासून ते आत्तापर्यंतच्या आधुनिक साहित्यापर्यंत एक श्रीमंत भाषा म्हणून मराठी भाषेकडे आता पाहावे लागेल असे गौरव उद्गार डॉ.रविंद्र शोभणे यांनी व्यक्त केले आहेत.

एकंदरीतच नवरात्रोत्सवाच्या या सुवर्णदिनी इतिहासात,ऐतिहासिक सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्याजोगा हा क्षण,नक्कीच महाराष्ट्र राज्यातील जनतेला आनंदाची पर्वणी देणारा ठरला असून,राज्यातील विविध सन्माननीय क्षेत्रातील सन्माननीय व्यक्तीनी व राज्यातील नागरिकांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे अतिशय आनंदी स्वागत केले आहे.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top